राज्य सरकारची कृतज्ञता ! शहिदांच्या कुटूंबाला मिळणार १ कोटीचं ‘अनुदान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने आपली खेळी साधण्यास सुरुवात केली आहे. त्यात भाजपने सामान्य जनतेची मने जिंकण्यासाठी प्रयत्न आतापासूनच सुरु केले आहेत. फडणवीस सरकारने दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीमध्ये वाढ केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर माहिती दिली आहे.

देशाच्या सीमेवर लढताना किंवा युद्धजन्या परिस्थितीत शत्रुशी सामना करताना हौतात्म आले या जवानांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १ कोटींची मदत दिली जाणार आहे. तर यावेळी युद्धात जखमी झालेल्या जवानांना २० ते ६० लाखांपर्यंतची मदत करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार १ जानेवारी पासून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या एकरकमी अनुदानाची रक्कम एक कोटी करण्यात आली आहे. तर अपंगत्व आलेल्या राज्यातील जवानांना ६० लाख रुपयांपर्यंत मदत करण्यात येणार आहे. यात १ टक्के ते २५ टक्के अपंगत्व आल्यास २० लाख, २६ टक्के ते ५० टक्के अपंगत्व आल्यास ३४ लाख, आणि ५१ टक्के ते १०० टक्के अपंगत्व आले तर ६० लाख रुपयांची मदत होणार आहे.

दरम्यान, देशासाठी आपले बलिदान देणार्‍या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबाला राज्य सरकार आर्थिक अनुदान देते. तसंच अपंगत्व आलेल्या जवानांनाही मदत केली जाते. १९९९ मध्ये दिल्या जाणाऱ्या दोन लाख रुपयांच्या अनुदानात शासनाने वेळोवेळी बदल करत ही रक्कम वाढवली आहे. २७ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार शहिदांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत म्हणून एकरकमी अनुदान देण्यात येत होते. तसेच अपंगत्व आलेल्या जवानांना १ टक्का ते १५ टक्के असल्यास ५ लाख, २६ टक्के ते ५० टक्के असल्यास ८.५० लाख तर ५१ टक्के ते १०० टक्के असल्यास १५ लाख रुपये देण्यात येत होते. ती रक्कम आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शहिद जवानांच्या कुटुंबाला यापुढे १ कोटीचे अनुदान देण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने