१ कोटीचे लाच प्रकरण : पत्रकाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- जमीनीच्या वारस नोंदी करण्यासाठी १ कोटीची लाच घेणाऱ्या तहसिलदारासह एक कथीत पत्रकाराला अँटी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेला सह आरोपी किसन सोमा बाणेकर (वय-४० रा. मु.पो. लवळे, ता. मुळशी) याला आज (रविवार) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयालयाने किसन बाणेकर याला २ जानेवारीपर्यंतची एसीबीची कोठडी सुनावण्यात आली.
वारस नोंदी करण्यासाठी १ कोटीची लाच घेणारा मुख्य आरोपी तहसिलदार सचिन डोंगरे याला शनिवारी (दि.२९) रंगेहाथ पकडण्यात आले. तर भ्रष्टाचाराच्या या गुन्ह्यात मदत करणाऱ्या कथित पत्रकार किसन बाणेकर याला आज (रविवार) दुपारी साडेचारच्या सुमारास अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात युक्तीवाद सादर करण्यात आला. वारस नोंदी करण्यासाठी तहसिलदार डोंगरे याने खासगी इसमामार्फत (पत्रकार बाणेकर) लाच स्विकारली. त्यामुळे यामध्ये आणखी किती लोकांचा समावेश आहे याचा तपास करणे बाकी आहे. तसेच खासगी इसम तथा पत्रकार याचा मुळशी तहसिलदार कार्य़ालयामध्ये वावर असून तो खासगी एजंट म्हणून काम करीत अहेत का याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला २ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी किसन बाणेकर याच्या वतीने अॅड. हेमंत झंजाड, अॅड. नंदकुमार शिंदे, अॅड. विवेक भार्गुडे, अॅड. कुमार पायगुडे यांनी  बाणेकर याच्या पोलीस कोठडीला विरोध करत युक्तीवाद केला.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेख घार्गे हे करीत आहेत.