Bombay Fever : 100 वर्षांपुर्वी बॉम्बे फिव्हरची दुसरी लाट ठरली होती अतिशय ‘गंभीर’ अन् ‘घातक’

मुंबई: पोलीसानामा ऑनलाईन – युरोपसह जगात कोरोनाची येणारी दुसरी लाट चिंताजनक आहे. भारतातही १९१८ ते १९२० मध्ये आलेली बॉम्बे फिव्हर महामारीची दुसरी लाट सर्वाधिक घटक ठरली होती. या महामारीचा स्वातंत्र्य चळ्वळीवरही परिणाम झाला होता.

जून १९१८ मध्ये जागतिक युद्धातून परतणाऱ्या सैनिकांबरोबर स्पॅनिश फीव्हरचे विषाणूही भारतात आले. भारतात याचा प्रवेश मुंबईतून झाल्यामुळे याला बॉम्बे फिव्हर असे नाव पडले. बॉम्बे डाक यार्ड येथे काम करणाऱ्या पोलिसाना याची पहिल्यांदा लागण झाली. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून आली त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, लक्षणे न दिसणाऱ्या सैनिकांमुळे मुंबई, पंजाब कलकत्ता यांसह संपूर्ण देशात ही लाट पसरली. पहिल्या लाटेत लहान मुले व वृद्धांना याची बाधा झाली. मृत्यूचे प्रमाणही कमी होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दुसरी लाट आली. ही लाट सर्वाधिक तीव्र होती. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ कोटी ३३ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक २० ते ४० वयोगटातील बाधित होते.

सुरुवातीच्या काळामध्ये महामारीच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध लावण्यात आले. मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. लोकांनी याचे पालनही केले. मात्र, लाटेची तीव्रता कमी होताच लोकांनी नियम पाळणे बंद केले. तेवढ्यात दुसरी लाट आली. भारतातील लोकसंख्येचा ५ टक्के बळी गेला. महामारीमुळे आलेले नपुसकत्व आणि महिलांचे मृत्यूचे प्रमाण यांमुळे १९९९ च जन्मदर पूर्वीपेक्षा ३० टक्के कमी झाला होता.