Coronavirus : 103 वर्षाच्या वृध्द महिलेनं ‘कोरोना’ व्हायरसला हरवलं, जाणून घ्या कशा वाचल्या आजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने संपूर्ण जगात खळबळ उडाली असताना, या प्राणघातक विषाणूशी लढा देऊन लढाई जिंकणारी सर्वात वृद्ध महिला समोर आली आहे. 103 वर्षीय झांग गुआंगफेंग यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. आता त्या बऱ्या होऊन सुखरूप घरी परतल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 100 वर्षांहून अधिक वयाची महिलेला काही दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूची लागण झाली होती. अहवालात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यानंतर महिलेला वुहानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेवर उपचार करुन अवघ्या सहा दिवसांत पूर्णपणे त्या बऱ्या होऊन घरी परतल्या.

या महिलेवर उपचार करणारे डॉक्टर जेंग युलन म्हणाले की, माइल्ड क्रॉनिक ब्रॉन्कायटीसशिवाय त्यांच्या तब्येतीत फार गंभीर लक्षणे दिसली नाहीत. एखाद्या स्त्रीची इतक्या लवकर पुनर्प्राप्ती एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. कोरोना विषाणूची लागण रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला लगेच होते. त्यामुळे वृद्ध लोक त्याचे बळी पडतात.

कोरोना विषाणूचा पराभव करणारी ही महिला आता जगातील सर्वात वयस्कर महिला बनली आहे. यापूर्वी वुहान शहरातील 101 वर्षीय वृद्ध व्यक्ती या प्राणघातक विषाणूमधून बरा होऊन बाहेर पडला होता.

या वृद्ध व्यक्तीची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगितले जात होते. कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अल्झाइमर, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका यासारखे लक्षणे दिसून येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 80,000 पेक्षा जास्त लोक याचे शिकार झाले असून त्यापैकी 3000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

चीनबाहेर कोरोना येथे मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. इटली आणि इराणमध्ये संक्रमण वेगाने पसरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील 124 देशांमध्ये कोरोनाचा परिणाम झाला असून एकूण 1,26,367 लोक कोरोनाने संसर्गित झाले आहेत.