पतंग उडवताना विजेचा शॉक लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पतंग उडवताना वीज वाहक तारेचा शाॅक लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना धुळे शहरातील ऊर्दु हायस्कुल समोर घडली आहे. वसीम मांज (11) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी वसीम आणि त्याचे मित्र पतंग उडवत होते. पतंगाचा दोर तुटल्याने पतंग हवेत उडत जावून तारेजवळ अडकला. वसीम पतंग काढण्यासाठी गेला असता त्याचा हात वीज वाहक तारेला लागल्याने जोरदार धक्का बसुन तो खाली पडला. परिसरातील नागरिकांनी पाहिले असता त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मयत घोषित केले. ही वार्ता अकबर चौकात समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like