11th Admission Pune | विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुण्यात आजपासून 11 वी प्रवेशास सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 11th Admission Pune | विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे (Pune) व पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिका कार्यक्षेत्रातील 11 वी प्रवेश प्रक्रियेस (11th Admission Pune) सोमवार 23 मेपासून सुरुवात होणार आहे. यानुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांना 23 ते 27 मे या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज (Online Admission Application) भरण्याचा सराव करता येणार आहे. 30 मेपासून प्रवेश अर्जाचा पाहिला भाग, तसेच, 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग प्रत्यक्ष भरता येणार असल्याचं शिक्षण विभागाने (Department of Education) सांगितलं आहे.

राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर (Mahesh Palkar) यांच्या माहितीनुसार, ”शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्या आणि कोट्यांतर्गत फेऱ्यातून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा. त्याचबरोबर प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे काढून ठेवावी,” अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत. (11th Admission Pune)

दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education) पुणे आणि पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता 11 वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने दिले जातात. शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Web Title : 11th Admission Pune | 11th admission eleventh entry in pune starts from today fyjc admission pune 2022-23

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर