काय सांगता ! होय, ना ‘पेट्रोल’ची चिंता अन् ना ‘बॅटरी’ची, 12 वी पास मॅकेनिकनं बनवली पाण्यावर चालणारी ‘कार’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की, गाडी चालवणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती आणि वाढते प्रदुषण यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे डिमांड वाढत चालले आहे. अशावेळी जर महागाईच्या जमान्यात एखादी अशी कार आली, जी पाण्यावर चालत असेल तर विश्वास ठेवणे अवघड होईल. परंतु, मध्यप्रदेशच्या एका मॅकेनिकने हा चमत्कार करून दाखवला आहे. मध्यप्रदेशमध्ये राहणार्‍या 44 वर्षीय मोहम्मद रईस महमूद मकरानी यांनी एक अशी कार बनवली आहे, जी पेट्रोल, डिझेल किंवा गैसवर नाही, तर चक्क पाण्यावर चालते. पाण्यावर चालणार्‍या या कारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

मोहम्मद रईस केवळ 12 वी पास
ही कार बनवणारे मोहम्मद रईस केवळ 12 वीपर्यंत शिकले आहेत. मॅकेनिकलचा कोणताही अभ्यास न करताही त्यांनी पाण्यावर चालणारी कार बनवली आहे. या कारचे त्यांनी पेटंटही घेतले आहे. वृत्त असे आहे की, मकराने यांच्या या पेटंटच्या आधारावर या कारची निर्मिती एक चायनीज कंपनी करणार आहे. मात्र, सोशल मीडियावर याबाबत म्हटले जात आहे की, भारतीय कंपन्यांनी यासाठी रईसशी का संपर्क साधला नाही.

मारुती 800 ला बनवली पाण्यावर चालणारी कार
मकरानी यांनी सांगितले की, त्यांनी 2007मध्ये एक प्रयोग सुरू केला. यांनतर 2012 मध्ये मारुती 800 मध्ये बदल करून एक अशी कार बनवली जी पेट्रोलऐवजी पाण्यावर चालेल. इंजिन बनवण्यासाठी आणि स्टार्ट करण्यासंदर्भात काम करण्यासाठी मकरानी यांना सुमारे दिड वर्ष लागले. या कारमध्ये 796 सीसी इंजिन आहे. सोबतच कार 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने पळते. या इन्व्हेंन्शनसाठी मकरानी यांना दुबई आणि चायनाच्या कंपन्यांकडून सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. पण त्यांनी मेक इन इंडियाने इन्स्पायर होऊन या सर्व ऑफर रिजेक्ट केल्या.

कारमध्ये आहेत ही वैशिष्ट्ये
पाण्यावर चालणारी ही कार छोटी नसून यामध्ये पूर्ण चार सीट आहेत. म्हणजे ड्रायव्हरसह चार प्रवासी प्रवास करू शकतात. या कारमध्ये एक टँक आहे, ज्यामध्ये पाणी भरले जाते. पाण्यासोबत थोडे केमिकल आणि चून्यासारखा एक पदार्थ टाकला जातो. यामुळे एसेटिलेन गॅस बनतो ज्यावर ही कार चालते. या गॅसने कोणतेही प्रदुषण होत नाही आणि कारसुद्धा वेगाने पळते.