Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’ व्हायरसचे 1384 नवीन रूग्ण, 27 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि इतर सरकारी विभाग देशातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणावर नजर ठेवुन आहेत. रविवारी आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय आणि आयसीएमआरनं संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये लॉकडाऊनचं कडक पालन करण्याबाबत गृह मंत्रालयानं सांगितलं.
1334 new #COVID19 cases & 27 deaths have been reported in last 24 hours, taking total cases to 15712 & deaths to 507 in India. No new case reported in Mahe in Puducherry & Karnataka's Kodagu in the last 28 days. Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/YsaMPJOnx5
— ANI (@ANI) April 19, 2020
परिस्थिती आढावा घेतल्यानंतरच सूट देण्याबाबत पावले उचलली जातील असं सांगण्यात आलं आहे. 23 राज्यामधील 54 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासुन कोरोना व्हायरसचा एकही रूग्ण आढळून आला नसल्याचं सांगितलं.
54 other districts in 23 States/Union Territories didn't report any cases in last 14 days. 2,231 patients have been cured so far in the country: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/qoNzrqtodO
— ANI (@ANI) April 19, 2020
देशात आतापर्यंत कोरोनाचे एकुण 15 हजार 712 प्रकरण समोर आली असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1384 नवीन प्रकरण समोर आली आहेत तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 507 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तब्बल 2281 रूग्ण बरे झाले आहेत. 20 एप्रिल नंतर कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट दिली जाणार नाही. लॉकडाऊनचं कडक पालन करण्यात येईल.
There are 755 dedicated hospitals and 1389 dedicated health care centers in the country, this takes the total dedicated facilities – where severe or critical patients can be treated – to 2144: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry #Coronavirus pic.twitter.com/Dcd0qw54RZ
— ANI (@ANI) April 19, 2020
देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 लाख 86 हजार 791 चाचण्या केल्याचं आयसीएमआर सांगितलं. शनिवारी 38 हजार 173 चाचण्या झाल्या असून त्यामधील 29 हजार 287 चाचण्या या आयसीएमआरच्या लॅबमध्ये केल्या आहेत तर 7886 चाचण्या खासगी लॅबमध्ये करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या उपचारासाठी आतापर्यंत 755 हॉस्पीटल तयार झाले आहेत. तसेच 1389 आरोग्य केंद्र देखील बनविण्यात आले आहेत.
We have done 3,86,791 tests so far. Yesterday 37,173 tests were done, out of these 29,287 tests were done in labs of ICMR network. 7,886 tested in private sector labs: Dr Raman R Ganga-khedkar, ICMR #Coronavirus pic.twitter.com/5qM9u03s1r
— ANI (@ANI) April 19, 2020