न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन
शेतजमीनीची खोटी कागदपत्रे तयार करुन दिवाणी न्यायालयात खोटा दावा दाखल करुन न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू राठोड असे या पोलीस हवालदाराचे नाव असून ते सोलापूर शहर गुन्हे शाखेत हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
याप्रकरणी सचिन शाम उकरंडे यांनी फिर्याद दिली आहे. उकरंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राठोड आणि त्यांच्या इतर १४ साथीदारांनी शेतीचे बनावट कागदपत्रे तयार केली. बनावट कागदपत्रे तयार करुन त्यामध्ये खोटी शेतजमीन दाखवल्याचे सचिन उकरंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच राठोड आणि त्याच्या इतर साथीदारांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.