Coronavirus : दिल्लीच्या नामांकित हॉस्पीटलमधील 3 कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, इतर 39 जणांचा केलं ‘क्वारंटाईन’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   दिल्लीतील साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलच्या दीडशे कर्मचार्‍यांना सेल्फ क्वारेन्टाईनमध्ये पाठविण्यात आले आहे. हे सर्व लोक दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. रुग्णालयातील कर्मचार्‍यांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्ड बॉय यांचा समावेश आहे, ज्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोविड च्या ज्या दोन रुग्णांकडून संसर्ग पसरण्याची भीती आहे, ते हृदयविकाराच्या आजाराच्या उपचारांसाठी मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचार्‍यांची चौकशी सुरू केली आहे. सर्व १५० लोकांची चाचणी घेतली जाईल. मॅक्स हॉस्पिटल कडूनही एक निवेदन आले असून त्यात असे सांगितले गेले आहे की एकूण ३९ लोकांना रुग्णालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले गेले आहे.

मॅक्स हॉस्पिटलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यांचे कोविड -१९ चे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या ३९ हेल्थकेअर कर्मचार्‍यांना रुग्णालयाच्या स्वतंत्र वेगळ्या शाखेत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची चिन्हे आढळली नाहीत. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर पाचव्या दिवशी ही चाचणी घेण्यात येईल. म्हणजेच १४ एप्रिल रोजी या सर्वांची चाचणी करण्यात येईल.