पुण्यात १५०० किलो भेसळयुक्त खवा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी ट्रॅव्हल्समधून १५०० किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. गुजरात राज्यातून पुण्यामध्ये हा भेसळयुक्त खवा विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल्स बसवर छापा टाकून खवा जप्त केला आहे. ही कारवाई चतु:श्रृंगी पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी सहाच्या दरम्यान केली.

चतु:श्रृंगी पोलिसांना गुजरात राज्यातून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये भेसळयुक्त खवा पुण्यामध्ये विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बालेवाडी येथे खासगी बसवर कारवाई करण्यासाठी चार वेळा सापळा रचला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आज सकाळी पोलिसांनी बालेवाडी येथे सापळा रचला. खासगी ट्रॅव्हल्समधून दुसऱ्या गाडीत खवा ठेवत असताना चतु:श्रृंगी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरु असून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात संबंधीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली बस ताब्यात घेतली आहे. ही बस पटेल एक्सप्रेस या खसगी ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

धक्कादायक… भावजई सोबत लग्न करण्यासाठी पत्नीची हत्या