पुण्यातील १७१ तर राज्यातील ४२८ एटीएम कार्डद्वारे कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरमध्ये व्हायरस सोडून सिस्टीम हॅक करुन बँकेची ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. बँकेचा सर्व्हर हॅक करुन ज्यावेळी पैसे काढण्यात आले त्यावेळी पुण्यातील १७१ तर राज्यातील ४२८ एटीएम कार्डचा वापर करण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e96b868-aa13-11e8-8769-95f72d666a24′]

हॅकर्सनी कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करुन भारतातून आणि २९ देशांमधून विविध ठिकाणावरुन एटीएमच्या मदतीने ही रक्कम काढली आहे. एकाचवेळी अनेक देशांमधून अशा पद्धतीने पैसे काढण्यात आल्याने बँकेचे तसेच पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्याचे कठीण आव्हान सायबर क्राईम पोलिसांवर असून त्यासाठी त्यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. त्यामुळे या पुढील तपास सायबर शाखेच्या ‘एसआयटी’ कडून सुरू करण्यात आला आहे.

बेस्ट नागीण डान्स प्रकरणी माधवी जुवेकर सह 7 जण बडतर्फ

सायबर सेलच्या एसआयटीने केलेल्या तपासात देशभरातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून रक्कम काढण्यात आली आहे. ही रक्कम २ कोटी ५० लाख रुपये आहे. ही रक्कम काढण्यासाठी महाराष्ट्रात ४२८ एटीएम कार्डच वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये पुण्यातील १७१ एटीएम कार्डचा समावेश आहे. ज्या खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते त्या खातेधारकांनी हव्यासापोटी रक्कम काढून घेतली. मात्र, या खातेदारांना ही रक्कम पोलिसांकडे जमा करावी लागणार आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43aaaed6-aa13-11e8-9bf1-3578e1ea157f’]

एटीएसने केलेल्या तपासामध्ये आत्तापर्य़ंत ७ जणांकडून ३ लाख ५५ हजार रुपये जप्त केले आहेत. सात जणांपैकी दोन जणांनी सोमवारी (दि.२७) पोलिसांकडे पैसे जमा केले आहेत. त्यापैकी पुण्यातील एकाने १६ हजार तर नंदूरबार येथील एकाने ९९ हजार रुपये पोलिसांकडे जमा केले आहेत. हॅकरने बँकेत पैसे जमा केल्यानंतर कोणत्याही खातेदाराला ९९ हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही याची काळजी घेतली आहे. अधिकची रक्कम जमा झालेल्या ग्राहकाला कोणताही फायदा होणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे.

वाचा आजच्या टॉप बातम्या