‘चिखलफेक’ प्रकरणी नितेश राणेंसह १९ जणांना सशर्त जामीन मंजूर

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन – उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणे यांच्यासह १९ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. जामीन देताना न्यायालयाने काही अटी घतल्या असून नितेश राणेंना दर रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

आमदार नितेश राणे यांना पोलिसांना सहकार्य कराव लागेल. तसेच अशा प्रकराचा गुन्हा पुन्हा होणार नाही अशी ग्वाही नितेश राणे यांनी न्यायालयात दिली आहे. याबाबत प्रकाश शेडेकर यांनी ४ जुलै रोजी सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार नितेश राणे यांच्यासह १८ स्वाभिमान कार्यकर्त्यांना अटक झाली होती.

याप्रकरणी कणकवली नगराध्यक्ष समीर अनंत नलावडे (वय-४५, कणकवली ), उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड(वय- ४५, कणकवली), संजय मधुकर कामतेकर(वय- ४६, कणकवली ), राकेश बळीराम राणे(वय -३५, कणकवली ), अभिजित भास्कर मुसळे (वय -४२, कणकवली ), निखिल आचरेकर (वय -३६ ,कणकवली ), राजन श्रीधर परब (वय -५४, कणकवली ), संदीप रमाकांत सावंत (वय -३५, वागदे), लक्ष्मण संभाजी घाडीगांवकर (वय – ४२, वागदे ), संदीप चंद्रकांत मेस्त्री ( वय -३६, कलमठ ), सदानंद उर्फ बबन गोविंद हळदिवे (वय -६०, फोंडाघाट), किशोर जगन्नाथ राणे (वय -५२, कणकवली ), शिवसुंदर शाहू देसाई (वय -२४, कणकवली), सचिन गुणाजी पारधिये (वय -३६, कळसुली ), विठ्ठल दत्ताराम देसाई (वय -५५, कणकवली), मिलिंद चंद्रकांत मेस्त्री (वय -३५, कलमठ ), संदीप बाळकृष्ण नलावडे (वय -३६, कणकवली ) यांचा अटक करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्या १९ जणांवर शासकीय कामात अडथळा, कटकारस्थान रचणे, रस्ता अडविणे यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. ५ जुलै रोजी नितेश राणे यांच्यासह अटकेत असलेल्या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सर्वांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात