जम्मू-काश्मीर : चकमकीत दोन जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. शहीद जवानांमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार बलजीत आणि १० अर्धसैनिक दलाचे सनीद यांचा समावेश आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे.

काल काश्मीरमधील उरी भागात काही संशयीत लोक आढळल्यानंतर, सुरक्षादलाने उरीमधील मोहरा कॅम्पनंतर पहाटे दोन संशयीतांना जवानांनी पाहिले होते. त्यानंतर हवेत गोळीबार करत जवानांनी दहशतवाद्यांना इशारा दिला होता. त्यानंतर सुरक्षादलाने शोधमोहीम हाती घेतली.

पुलवामा येथील रत्नीपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सुरक्षा दलांनी गावात शोधमोहीमेला सुरुवात केली. यावेळी सुरक्षादलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेरले. या दरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा देखील करण्यात आला आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या हिलाल अहमद या दहशतवाद्याला चकमकीत कंठस्नान घातल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली. या चकमकीदरम्यान स्थानिकांनी सुरक्षा दलांच्या कारवाईला विरोध केल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम हाती घेतलेल्या सुरक्षादलाच्या जवानांवर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. याबरोबरच परिसरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us