नैनिताल: वृत्तसंस्था
सोशल मीडियाचा वापर करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत किंवा बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येते. तरी सुद्धा असे अनेक प्रकार घडतात. मात्र आता आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. सदर व्यक्तीने राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे सचिव जी.आर.नौटियाल यांच्याविरोधात पोस्ट केली होती. याप्रकरणी उत्तराखंड उच्च न्यायालयाने त्याला तब्बल 2 लाखांचा दंड केला आहे.
[amazon_link asins=’B07FP45DR3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc8799f6-9baa-11e8-a550-a161e2f43deb’]
कारगेती यांच्याविरोधात नौटियाल यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. न्यायमूर्ती लोकपाल सिंह यांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या चंद्र शेखर कारगेती यांना दोन लाख रुपयांचा दंड केला. त्याच्या फेसबुक पोस्टवरून असा अर्थ निघत होता की संबंधित अधिकारी भ्रष्ट आहेत, असे मत न्यायालयाने नोंदवले. अशा पोस्टमुळे अधिकारी मानसिकदृष्ट्या खचतो आणि त्याची कर्तव्ये पार पाडण्यास कमी पडू शकतो असेही न्यायालयाने यावेळी म्टटलं आहे.