2000 च्या नोटासंदर्भात मोठा निर्णय, ‘ब्रँच’ आणि ATM मधून नाही मिळणार ‘ही’ नोट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपल्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. यापूर्वीही बर्‍याचदा असे वृत्त देण्यात आले आहे की सरकार २००० रुपयांच्या नोटांचे प्रसारण बंद करणार आहे. आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की २००० रुपयांच्या नोटांचे मुद्रण कमी करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे अशा देखील बातम्या समोर येत आहेत की कर्मचार्‍यांना २००० रुपयांच्या नोटा न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अहवालानुसार एका सरकारी बँकेने आपल्या कर्मचार्‍यांना लेखी आदेश काढला आहे की त्यांनी ग्राहकांना २००० रुपयांच्या नोटा देऊ नयेत किंवा २००० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये ठेवू नयेत. हे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँक कर्मचार्‍यांना २००० रुपयांच्या नोटा प्रसारित न करण्याचे आदेश दिले आहेत.

२००० च्या नोटा होणार बंद !
बिझनेस इनसाइडर वेबसाइटने आपल्या अहवालात असा दावा केला आहे की एका मोठ्या सरकारी बँकेने आपल्या कर्मचार्‍यांना २००० रुपयांच्या नोटा प्रसारित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेबसाइटने एका बँकेच्या अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने बँकेच्या कर्मचार्‍यांना २००० रुपयांऐवजी ग्राहकांना अन्य नोटा देण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एटीएममध्ये २००० रुपयांच्या नोटा न भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तथापि, ग्राहकांनी पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेत २००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.

एटीएम मधून देखील निघणार नाहीत २००० च्या नोटा
अहवालात असा दावा केला आहे की, सरकार २००० रुपयांच्या नोटा बंद करणार आहे. बँकेने पाठवलेल्या एका ईमेलमध्ये म्हटले आहे की लवकरच बँकेकडून या बाबतीत अधिकृत घोषणा व आदेश देण्यात येतील. बँकेने २००० रुपयांच्या नोटांऐवजी १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा प्रसार वाढवावा. तसेच एटीएममध्येही या नोटांची संख्या वाढवायला हवी. अहवालानुसार, सर्व व्यवस्थापकांना सांगण्यात आले आहे की दुसर्‍या दिवशीच व्यवहारात याची अंमलबजावणी करावी.

१०० रुपयांच्या नोटांचे प्रसारण वाढेल
तसेच अहवालात असे देखील सांगण्यात आले आहे की बँकेने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की त्यांनी १०० रुपयांच्या नोटांचा जास्तीत जास्त वापर व्यवहारात करावा. बँकेने १०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा वाढवण्यास सांगितले असून वास्तविक पाहता नुकतेच नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने आपल्या अहवालात म्हटले आहे की २००० रुपयांच्या नकली नोटांची संख्या सध्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. अहवालानुसार वसूल केलेल्या बनावट नोटांमध्ये २००० रुपयांच्या नोटांचा वाटा जवळपास ५६ टक्के आहे.