कॉलेजच्या गेटबाहेर गोळी झाडून तरुणीची हत्या, भाजपा नेत्याकडून Video शेअर करत ‘सवाल’

फरीदाबाद : वृत्तसंस्था – हरियाणामधील फरिदाबादमध्ये ( Faridabad) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील शहरातील एका कॉलेज युवतीची कॉलेजच्या गेटबाहेरच गोळ्या झाडून हत्या ( Murder) करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत विद्यार्थींनी बी-कॉम च्या तिसऱ्या वर्गात शिकत होती. काल संध्याकाळी 4 वाजता पेपर देऊन कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला ( Attack) करण्यात आला आहे. बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजबाहेर ( Agrawal Collage) ही घटना घडली असून या घटनेनंतर संतप्त जमावाने सोहना-बल्लभगढ रस्त्यावर रास्ता रोको केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या हापूल येथिल हे कुटुंब फरिदाबाद येथे शिफ्ट झाले होते. निकिता तोमर ( Nikita Tomar) असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून आरोपीबरोबर ती १२ वी पर्यंत शिकत होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर तिचे धर्मांतर करण्याचा त्याचा डाव होता. मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्यानंतर तौशीफने सन 2018 साली निकाताचे अपहरण केले. मात्र, बदनामीच्या कारणास्तव त्यावेळी कुटुंबीयांना ते प्रकरण आपापसात मिटवले असल्याची माहिती यावेळी मुलीच्या वडिलांनी दिली.

काल संध्याकाळी पेपर सुटल्यानंतर तिची आई आणि भाऊ कॉलेजबाहेर तिची वाट पाहत उभे होते. त्यावेळी त्याठिकाणी एक कार तेथे आली, त्या कारमधून आलेल्या तीन ते चार जणांनी निकीताला गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये, तौशीफ सर्वात पुढे होता. त्यानंतर त्याने तिच्या भावाला पाहिले असता तिच्यावर गोळी झाडली.त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने पोलिसांना यासंदर्भात फोन करून माहिती दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) सहाय्याने आरोपींचा शोध घेण्यात येत असून मुख्य आरोपी तौशीफ यास पोलिसांनी अटक ( Arrest) केल्याचे बल्लभगडच्या डीसीपींनी सांगितले. दरम्यान, भाजप नेत्या प्रीती गांधी ( Priti Gandhi) यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला असून जर तुम्ही समस्या स्विकारत नसाल तर, त्याचे समाधानच होणार नाही. आज निकिता बळी गेली, उद्या आणखी कोण?… असा सवाल करत लव्ह जिहाद ( Love Jihad) नाकारता येणार नसल्याचं देखील गांधी यांनी म्हटलं आहे.