आले गणराय ! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज, 210 विशेष गाड्यांचे ‘नियोजन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवाची चाहूल आता सगळ्यांना लागू लागली आहे. सगळीकडेच गणेश उत्सवाची तयारी मोठया प्रमाणावर सुरु आहे. गणेश उत्सवात गावी जाण्यासाठी मुंबई वरून अनेक जण कोकणच्या दिशेने प्रवास करतात. हीच बाबा लक्षात घेऊन कोकण रेल्वेने आपल्या रोजच्या गाड्यांमध्ये बदल करत जास्तीच्या गाड्या कोकणाच्या दिशेने सोडण्याचे निश्चित केले आहे.

गणेशोत्सवामध्ये कोकण रेल्वेच्या २१० फेऱ्या होणार आहेत तर रेल्वे गाडयांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला ३० ऑगस्टपासून सावंतवाडीत थांबा तयार होणार आहे. याचा सात लाखांहून अधिक प्रवाशांना लाभ होणार आहे.

यावेळी रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी चांगलीच तयारी केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियोजित गाड्यांबरोबर खास रेल्वेगाड्याही सुरु करण्यात आल्या आहेत. तिकीट बुकिंगसाठीच्या ज्यादा खिडक्या उघडण्यात आलेल्या आहेत. तसेच ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टीम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी सुरु केली आहे.

कोकण भागातील अनेक बस स्थानकावर आरोग्य सुविधा दिली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने खास सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे. जेणेकरून सुरक्षेसाठी कोणतीही कमतरता भासू नहे.

आरोग्यविषयक वृत्त –