एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने २२ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींना ईमेल आणि मोबाईलवर संपर्क साधून एमबीबीएसला प्रवेश देण्याचे अमिष दाखवून त्यांना फसवणाऱ्या चार जणांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांनी दोन तरुणांना २१ लाख ६४ हजारांना गंडा घातला आहे. हा प्रकार ७ मे ते २९ ऑगस्ट दरम्यान टाऊन्स स्केअर मॉलमधील ईमर्ज ब्रेन स्टोअर्म इंडीया प्रा. लि. मध्ये घडला.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc05756d-ad0f-11e8-b56a-15eb1a21c309′]

निखील कमलकिशोर अरोरा (वय-१९ रा. जुनबानी, छत्तीसगढ), अलोक रंजन, विनोदकुमार गुप्ता, अमित बन्सल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुक्‍ता दाभोळकर, जितेंद्र आव्‍हाड होते निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी ईमर्ज ब्रेन स्टोअर्म इंडीया प्रा. लि. नावाचे ऑफिस सुरु करुन मुला-मुलींशी मेलद्वारे आणि फोनवरुन संपर्क साधला. या मुलांना एमबीबीएस मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश करुन देण्याचे अमिष दाखवले. फिर्य़ादी यांचा मुलगा हर्षिल याला कर्नाटक येथे एमबीबीएससाठी प्रवेश देतो असे सांगून विजय त्रिभुवन याच्याकडून २१ लाख ६४ रुपये घेतले. पैसे घेऊनही त्यांना एमबीबीएसला प्रवेश न देता आरोपींनी लाखो रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

Please Subscribe Us On You Tube