Coronavirus : दिलासादायक ! राज्यात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, गेल्या 24 तासात 8706 जण झाले ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशातील कोरोना बाधितांची संख्या 14 लाखांच्याही पुढे गेली आहे. देशातील महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने राज्याची स्थिती गंभीर बनत चालली आहे. राज्यात सोमवारी 7924 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 83 हजार 723 इतकी झाली आहे. त्याचवेळी राज्यात 227 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 7924 नवी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.92 टक्के आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 8706 रुग्ण बरे झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 21 हजार 944 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणात 57.84 टक्के इतके झाले आहे.

राज्यात कोरोनग्रस्तांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.62 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यामध्ये 1 लाख 47 हजार 592 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यामध्ये 9 लाख 22 हजार 637 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 44 हजार 136 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. राज्यात आतापर्यंत 19 लाख 25 हजार 399 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.