इंदापूरात श्रवण यंत्रासाठी २३४ जेष्ठांनी केली नाव नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून इंदापूर येथील कर्णबधीर विद्यालयामध्ये जेष्ठ नागरिकांच्यासाठी मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नाव नोंदणी व तपासणी शिबीराचे आयोजन मंगळवार दिनांक १३ ऑगष्ट रोजी करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन इंदापूर कृृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, नगरसेवक श्रीधर बाब्रस, प्राचार्य अमोल उन्हाळे सर, जेष्ठ नेते जावळेबापू हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या शिबीरात २३४ जेष्ठ नागरिक व महिला यांची कान तपासणी करून श्रवण यंत्र मशिन मिळण्यासाठी नाव नोंदणी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई, स्टार्की हिअरींग फाऊंडेशन व अपंग हक्क विकास संघ,महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांचे संयुक्त माध्यमातुन या शिबीरातील जेष्ठ नागरिकांची तज्ञ डाॅक्टरांच्या पथकाकडून कानाची तपासणी करण्यात आली. यासाठी ठाकरसी ग्रुप मुंबई व पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांचे विषेश सहकार्य लाभले. या शिबीरामध्ये २३४ जेष्ठ नागरिक व महिलांची श्रवण यंत्र मशिनसाठी नाव नोंदणी करण्यात आली असुन एक महिण्यानंतर नाव नोंदणी केलेल्या जेष्ठ नागरिक व महिला यांना श्रवण यंत्र वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी दीली.

आरोग्यविषयक वृत्त –