तीन पिस्टलसह 14 जिवंत काडतुसे जप्त

पुणे: पोलीसनामा आॅनलाइन

लष्कर पोलिसांनी तीन पिस्टलसह 14 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी ध्रुवबाळ वेडु सुरासे (वय,36 रा. आडसुरेगाव, भिल्लवस्ती, ता. येवला, जि. नाशिक), संतोष काशिनाथ सोनवणे (वय,26 रा. फकीराबादवाडी, ता. वैजापुर, जि. आैरंगाबाद) यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांना जे.जे गार्डन कॅम्प येथे दोघेजण कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. याबाबतची खात्रीशिर माहिती मिळाल्यामुळे जगताप यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करत आरोपी ध्रुवबाळ व आरोपी संतोष यांचेकडून तिन पिस्टल व 14 जिवंत काडतुसे काडतुसे जप्त केली.

या प्रकरणातील आरोपी ध्रुवबाळ हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून पाच पिस्टल जप्त करण्यात आलेले होते. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो सेना दलात नोकरीला होता, त्याला 2009 मध्ये सेनेतुन बडतर्फ करण्यात आलेले आहे. त्याने अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत, तसेच पुणे शहरात अाणखी कोणाला पिस्टल विक्री केले आहे, याविषयी पोलीस तपास करत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त डाॅ. प्रविण मुंढे, सहा. पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड (लष्कर विभाग, पुणे) यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पो. नि. वसंत कुवर, पो.नि.(गुन्हे) संगीता यादव यांचे नेतृत्वाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. उप नि. विशाल चव्हाण व सहा. पो. उप नि. राजेश सोनवणे, पो. हवा. शैलेश जगताप, पो. हवा. गणपत थिकोळे, पो. हवा. प्रदिप शितोळे, पो. ना. अमोल शिंदे, पो. शि. अमोल राउत, पो.शि. पवन भोसले, पो.शि. राहुल शिंगे, पो.शि. सागर हुवाळे, पो. शि. आबासाहेब धावडे, यांनी केलेली आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास लष्कर पोलिस स्टेशनचे पो. उप नि. विशाल चव्हाण करत आहेत.