संगमनेरमध्ये भाजपाकडून 24 इच्छुकांच्या मुलाखती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगर जिल्ह्यातील बाराही मतदार संघासाठी मुलाखती घेण्यात आल्या. सर्वात जास्त २४ इच्छुक उमेदवार संगमनेर तालुक्यातून आले होते.

विधानसभेची तारीख या महिन्यात कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहेत. अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा असून, सर्वच पक्ष जिल्ह्यात आपली ताकद पणाला लावताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्हा हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला होताना दिसतोय. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याची ओळख होती. मात्र आता या वर्षी भारतीय जनता पार्टी नगर जिल्ह्यात बाराही विधानसभा लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

कारण आज भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार रामदास आंबेडकर यांनी या मुलाखती घेतल्या. प्रत्यक्ष उमेदवार असेल त्याच्याशी समर्थ मोर्चाकडून मतदारसंघाचा आढावा घेत पक्षासाठी आणि मतदारांसाठी काय योगदान केले. याबाबत उमेदवारांना विचारण्यात आले. सर्वात जास्त इच्छुक उमेदवार संगमनेर तालुक्यात असून 24 जणांनी यावेळी मुलाखती दिल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत अकोले, संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर या ठिकाणच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीच्या ठिकाणी अनेक जणांनी आपल्या कार्यकर्त्यांची गर्दी केली होती.

विद्यमान आमदार मोनिका राजळे, आ. शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी ठाण मांडून होते.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like