केईएम रुग्णालयातील 24 वर्षीय इंटर्न डॉक्टर बेपत्ता 

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईन

मुंबईमधील केईएम रुग्णालयातील 24 वर्षीय इंटर्न डॉक्टर हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता असल्याने यांच्या कुटुंबाने भोईवाडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2047eab1-9703-11e8-bfa0-15c15d23fdee’]

अजिंक्य मौर्य (२४) असे डॉक्टरचे नांव आहे. चिंताग्रस्त असलेला डॉक्टर मौर्य चार दिवसांपूर्वी मेडिटेशन करत होता. सोमवारी संध्याकाळी त्याने आपल्या मित्राला मला जावे लागेल एवढं सांगून तो हॉस्टेलबाहेर पडला. यानंतर चार दिवस उजाडले तरी अजिंक्य कुठे आहे याबद्दल माहिती मिळाली नाही. अजिंक्य त्याचा मोबाईलही हॉस्टेलमध्येच ठेवून गेल्यामुळे शोधण्यात अडचणी येत आहेत. पोलिस आणि कुटुंबीय त्याचा प्रयत्न घेत आहेत. अजिंक्यला शोधण्यासाठी सोशल मीडियावर डॉक्टरांनी शोधमोहीम सुरु केली आहे. अजिंक्य मौर्य कुठे दिसल्यास त्वरित पोलिसांशी अथवा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करण्याचे आवाहन सोशल मीडियावरुन करण्यात येत आहे.