‘काळुबाई’च्या सेटवर ‘कोरोना’ची ‘धाड’, तब्बल 27 जणांना बाधा, आशालता यांची प्रकृती चिंताजनक !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   माझी आई काळुबाई या मालिकेच्या सेटवरील तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या मालिकेच्या सेटवर कोरोनानं धाड टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात मालिकेचं शुटींग सुरू होतं. अशात आता 27 जणांना कोरोना झाला आहेत. चिंताजनक बाब अशी की या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावर यांनाही कोरोनाची लागण झाली असून ती त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

आई माझी काळुबाई ही मालिका लॉकडाऊननंतरच्या काळात सुरू झाली. या मालिकेत प्राजक्ता गायकवाड, अल्का कुबल, आशालता वाबगावकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेत गण्याचं शुटींग सुरू होतं. यासाठी काही मंडळी मुंबईतून आली होती. साताऱ्याजवळ असलेल्या खानविलकर फार्महाऊसवर या गाण्याचं शुटींग सुरू होतं. तिथं कोरोनाचा संसर्ग झाला आणि 27 जण बाधित झाले. या सगळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती मात्र चिंताजनक झाली आहे. सध्या त्या साताऱ्यातील रुग्णालयात व्हेंटीलेटरवर आहेत.

याबद्दल एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मालिकेच्या निर्मात्या अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या, “सेटवर कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांवर तातडीनं उपाचर करण्यात आले. त्यामुळं लागण झालेली सर्व मंडळी आहेत त्यातून बाहेर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्या सध्या व्हेंटीलेटवर आहेत.”

खानविलकर फार्महाऊसचा सर्व परिसर सध्या सील करण्यात आला आहे. इथलं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. मालिकेतील एका गाण्याच्या शुटींगसाठी मुंबईतून काही डान्सर्स आले होते. त्यांची कोरोना चाचणी न झाल्यानं हा प्रकार घडल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. यातलं सत्य अद्याप समोर आलेलं नाही.