भारत युद्धासाठी सज्ज ; २७०० कोटींची शस्त्रे खरेदी करण्यासाठी तातडीची मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सकाळ पासुन भारत आणि पाकिस्तानमध्ये ताणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या ३ विमानांनी भारतात घुसखोरी करत बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्यानेही आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानचा डाव उधळून लावत ती विमाने परतवली आहे . पाकिस्तानच्या या कारवायांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवसस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय सेनेनही आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाला २७०० कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदी करण्यासाठी सरकारने तातडीने मंजूरी दिल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. या शस्त्रांमध्ये पाणबुड्यांचाही समावेश आहे, असंही अरूण जेटलींनी सांगितलं आहे.

तसा भारत हा जगात सर्वाधिक शस्त्र खरेदी करणारा देश आहे. त्यामुळे आता पाकिस्ताने काही केले तर त्याला प्रत्त्युतर देण्यासाठी भारत तयार झाला आहे . त्यासोबतच जेटलींनी आक्रमक भूमिका घेत मोठे वक्तव्य केले आहे. लादेनला मारलं जाऊ शकत…! तर काहीही होऊ शकतं. म्हणजे लादेनला मारलं जाऊ शकतं तर ”मसूद अजहरला” ही मारलं जाऊ शकतं, असं वक्तव्य जेटलींनी केले आहे. तसंच जर आमेरिका करू शकतो तर भारत ही करू शकतो, असं मोठे वक्तव्यही त्यांनी केले आहे. त्यावरून भारत आता कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट होत आहे.