TikTok आणि UC ब्राऊजर नंतर आता PUBG सह 275 चीनी अ‍ॅप्स होऊ शकतात ‘बॅन’, भारत सरकार करतंय ‘तपास’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात 59 चीनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर आता सरकार चीनच्या अन्य 275 अ‍ॅप्सवर बंदी आणण्याची तयारी करत आहे. हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे नॅशनल सिक्युरिटी आणि युजऱ प्रायव्हसीसाठी धोकादायक आहेत का, याचा तपास सरकार करत आहे. सूत्रांनुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहे, त्यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सूत्रांनुसार, या 275 अ‍ॅप्समध्ये गेमिंग अ‍ॅप पब्जीसुद्धा सहभागी आहे, जे चायनाच्या वॅल्यूबल इंटरनेट टेन्सेन्टचा भाग आहे. सोबतच यामध्ये झाओमीने बनवलेले झीली अ‍ॅप, ई-कॉमर्स अलिबाबाचे अलिएक्सप्रेस अ‍ॅप, रेसो अ‍ॅप आणि बायटेडन्सचे यू लाईक अ‍ॅपचा समावेश आहे. या डेव्हलपमेंटशी संबंधीत एका व्यक्तीने सांगितले की, सरकार हे सर्व 275 अ‍ॅप्स, किंवा यापैकी काही अ‍ॅप्स बॅन करू शकते. मात्र, यामध्ये कोणताही दोष आढळला नाही तर बॅन लावला जाणार नाही.

यामध्ये सहभागी एका अधिकृत सूत्राने सांगितले की, चीनच्या अ‍ॅप्सचे सतत निरीक्षण केले जात आहे आणि शोध घेतला जात आहे की, यांना फंडिंग कुठून होत आहे. काही अ‍ॅप्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. सोबतच काही अ‍ॅप्स डेटा शेयरिंग आणि प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.

नियम बनवण्याच्या तयारीत सरकार
रिपोर्टनुसर, भारत सरकार आता अ‍ॅप्ससाठी नियम बनवत आहे, जे सर्वांना पाळावे लागतील, आणि जर असे झाले नाही तर तर ते अ‍ॅप्स बॅन केले जातील. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, हा सरकारचा मोठा प्लॅन आहे, जेणेकरून सायबर सिक्युरिटी मजबूत करता येईल आणि भारतीय नागरिकांचा डाटा सुरक्षित करता येईल. हे नियम सांगतील की, कोणत्या अ‍ॅपला काय करायचे आहे आणि काय नाही करायचे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी 59 चीनी अ‍ॅप बॅन केले होते. ज्यामध्ये सर्वात पॉप्युलर टिकटॉकचा समावेश होता. याशिवाय यामध्ये युसीवेब, युसी न्यूज, शेयरइट, कॅमस्कॅनर सारखी पॉप्युलर अ‍ॅप होती.