भारत सरकारनं जारी केला देशाचा नवीन ‘नकाशा’, नव्या ‘रूपात’ जम्मू-काश्मीर आणि लडाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश झाले आहेत आणि आज (शनिवार) अखेर गृहमंत्रालयाकडून 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश असलेल्या नवा नकाशा सादर करण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर 2019 पासून दोन्ही केंद्रशासित प्रदेशांची व्यवस्था अस्तिवात आली.

5 ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला आणि राज्यातील कलम 370 रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्यात आल्यानंतर आज नवा राजकीय नकाशा सरकारकडून सादर करण्यात आला. 2 दिवसांपूर्वीच या दोन्ही केंद्रशासित प्रदेशात नायब राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत.


 

शुक्रवारी दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांनी जम्मू काश्मीरच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ घेतली. मागील आठवड्यात केंद्र सरकारने आयएएस अधिकारी गिरीश चंद्र मुर्मू यांना जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आले तर माजी अधिकारी आर. के. माथूर यांची लडाखच्या नायब राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली.

तर दिलबाग सिंह हे जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालक पदी कायम राहणार आहेत, तर आयजी लेवल अधिकारी हे लडाखमध्ये पोलीस प्रमुख असतील. दोन्ही दल आता केंद्रशासित प्रदेशात विलीन करण्यात आले आहेत.

1947 मध्ये जम्मू काश्मीर राज्यात फक्त 14 जिल्हे होते. ज्यात कठुआ, जम्मू, ऊधमपूर, रियासी, अनंतनाग, बारामूल्ला, पुंछ, मीरपूर, मुजफ्फराबाद, लेह आणि लडाख, गिलगिट, गिलगिट वजारत, चिल्हास आणि ट्रायबल टेरिटरी यांच्या समावेश होता.

2019 पर्यंत जम्मू काश्मीर राज्य सरकारने 14 जिल्ह्याचे क्षेत्र पुनर्गठित करुन 28 जिल्हे तयार करण्यात आले. नव्या जिल्ह्याचे नाव कुपवारा, बांदीपूर, गंडरेबल, श्रीनगर, बडगाम, पुलवामा, शुपियान, कुलग्राम, राजौरी, रामबन, डोडा, किश्तवार, साम्बा आणि कारगिल आहेत.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या