29 सप्टेंबर राशीफळ : कर्क, तुळ आणि मकर राशीसाठी शुभ आहे दिवस, वाचा मंगळवारचे भाकित

मेष
29 सप्टेंबर राशीफळ आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे मन आनंदित होईल. मित्रमैत्रिणींमध्येही खूप संवाद होईल. ते मदत करतील. विवाहित लोकांच्या जीवनात वाद होऊ शकते, सावधगिरी बाळगा. लव्ह लाइफसाठी आजचा दिवस म्हणजेच 29 सप्टेंबर खूप सुंदर आहे. मनातील बोलण्याची संधी मिळेल आणि रोमँटिक वातावरण असेल. कामात मेहनत करा. आरोग्य चांगले राहील.

वृषभ
29 सप्टेंबर राशीफळ आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सर्व लक्ष कामावर असेल, ज्यामुळे कामगिरीमध्ये प्रचंड सुधारणा होईल. कामात बळ मिळेल. घरातील वातावरणही चांगले राहील. आपापसांत प्रेम दिसेल. विवाहित व्यक्तींच्या जीवनात संशय असू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा. प्रेमासाठी दिनमान सामान्य असेल.

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. घरात स्वत:ला जास्त स्मार्ट समजण्याचा प्रयत्न करणे हानिकारक आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी प्रेमाने बोला. कुटुंबातील लहानांकडून प्रेम मिळेल. विवाहित लोकांच्या जीवनासाठी मजबूत दिवस आहे. परस्पर समंजसपणा विकसित होईल. प्रेमासाठी दिवस चांगला आहे, परंतु भांडण टाळा, काहीही चुकीचे बोलू नका. कामासाठी दिवस मजबूत आहे. प्रगती साधाल.

कर्क
आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. एखाद्या गोष्टीची किंवा मुलाच्या आरोग्याबद्दल काळजी असेल. विवाहित व्यक्तींचे जीवन सामान्य असेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमात एखाद्या गैरसमजामुळे प्रिय व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. कामासाठी दिनमान खूप मजबूत आहे. आरोग्याची काळजी घ्या

सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. व्यवसायात यश मिळेल. विवाहित व्यक्तींचे जीवन खूप चांगले राहील. सर्व लक्ष जोडीदाराच्या आनंदावर असेल, म्हणून आज त्यांना खूप आनंद मिळेल. प्रेमसंबंधात मनापासून बोलाल आणि प्रिय व्यक्ती प्रेम उघडपणे स्वीकारेल. कामासाठी दिनामान प्रबळ आहे. आरोग्यही चांगले राहील. भाग्याची साथ मिळेल.

कन्या
आजचा दिवस मध्येम ते फलादायक असेल. मानसिक ताण चिंताग्रस्त करू शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल थोडेसे दु:खी होऊ शकता. हलका ताप देखील येऊ शकतो. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दीर्घ प्रवासाची योजना आखली जाऊ शकते. कामासाठी दिनमान मध्यम आहे. कौटुंबिक सहकार्य मिळेल. प्रेमात विवाहित लोकांसाठी दिनमान सामान्य आहे. आयुष्याबाबत आशावादी राहाल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. मुलांसाठी मनामध्ये विशेष प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात रोमँटिक असाल प्रिय व्यक्तीचे मन जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न कराल. विवाहित व्यक्तींचे जीवनही चांगले राहील. परंतु, जोडीदार थोडा आक्रमक असेल, मात्र प्रेम राहील. कामात प्रयत्नांचे फळ मिळेल, परंतु तरीही तुम्ही प्रगतीवर अधिक समाधानी दिसणार नाही.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घरी काही नवीन कामे कराल. कुटुंबाकडे लक्ष द्याल, कामात मन लागणार नाही, म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहित लोकांचे सामान्यपणे व्यतीत होईल. प्रेमात खूप सकारात्मक असाल. घरात खर्च होईल, परंतु उत्पन्नामुळे जास्त त्रास होणार नाही.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. मनात काहीतरी नवीन करण्याचे विचार येतील. कामात भाग्य प्रबळ राहील आणि चांगले परिणाम मिळतील. उत्पन्नामध्येही चांगली वाढ होईल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. आरोग्य बळकट होईल. प्रेमासाठी दिनमान मध्यम आहे. शांततेत काम करणे चांगले ठरेल. विवाहित व्यक्तींच्या जीवनात तणाव असेल.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. पैसा येईल, ज्यामुळे घरची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात प्रेम असेल. रिअल इस्टेटशी संबंधित बाबी आपले लक्ष वेधून घेतील. कामात बुद्धी वापरून चांगले नाव कमवाल, परंतु एखाद्याशी संघर्ष होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. विवाहित व्यक्तींचे जीवन चांगले असेल. लव्ह लाइफमध्ये दिवस रोमँटिक असेल. प्रिय व्यक्तीसोबत खूप आनंद राहाल.

कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. मानसिक तणावापासून दूर असाल, आरोग्य चांगले राहील. स्वतःकडेही लक्ष द्याल. लव्ह लाइफसाठी आजचा दिवस खूप सुंदर असेल. नात्यात पुढे जाण्यासाठी प्रिय व्यक्तीशी बोलू शकता. विवाहित लोकांचे जीवन रोमँटिक राहील आणि दिवसाचा आनंद लुटाल. कामात थोडे लक्ष द्यावे लागेल.

मीन
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. खर्चात अचानक वाढ झाल्याने लक्ष विचलित होईल. एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त होऊ शकता. उत्पन्न ठीक होईल. अनुभव कामात उपयोगी पडेल, ज्यामुळे कठीण वेळीसुद्धा चांगले प्रदर्शन कराल. विवाहित लोकांसाठी किंचित कमकुवत दिवस आहे. जोडीदार काहीतरी कटू बोलू शकतो.