सातार्‍यात 3.3 रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का !

पुणे : सातारा येथे आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भुकंपाचा धक्का बसला़ भुकंपाची तीव्रता रेक्टर स्केलवर ३.३ इतकी मोजण्यात आली. त्याचे केंद्र जमिनीखाली ५ किमी खोल होते.

सातार्‍यातील भुकंपाचे केंद्र हे १७.३६ आणि ७३.८४ रेखांश आणि अक्षांशावर होते. भुकंपाचा केंद्रबिंदू पणजीपासून २०७ किमी अंतरावर होते.

सातारा जिल्ह्यासह कोल्हापूरपर्यंत या भुकंपाचा धक्का जाणवला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीच भुकंपाचे छोटे धक्के जाणवत असतात. आज झालेल्या भुकंपाचा केंद्रबिंदू उंबज पाटण रोडजवळ जमिनीखाली होता.

M: 3.3 – 84km NNW of Kolhapur, Maharashtra, India
Origin Time : 2021-05-23 09:16:53 (IST)
Lat, Long : 17.36, 73.84
Magnitude : 3.3
Depth : 5km
Event Status : Reviewed