३ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांकडे जाणीवपुर्वक दूर्लक्ष केल्याने रांजणगाव एमआयडीसी व लोणीकंद पोलीस ठाण्यातील ३ पोलीस हवालदारांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अमिरुद्दीन रफीरद्दीन चमन शेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार डी़ सी़ बेंद्रे व डी़ एऩ गायकवाड अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदारांची नावे आहेत.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली बीट अंतर्गत वाघोली गावातील खांदवेनगर येथे पत्र्याच्या शेडलगत जुगारावर छापा घातला होता. त्यावेळी कल्याण मटका चालविणाऱ्या ६ जणांविरुद्ध कारवाई करुन १३ हजार ८१० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले होते. तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आय सी आय सी बँकेसमोरील सुखकर्ता एंटरप्रायझेस दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करुन ३० हजार ६७० रुपयांची जुगाराची साधने जप्त केली होती.

या अवैध धंद्यांकडे दूर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात तिघांनी गंभीर कसूरी केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिले.

यापुढे अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचे धोरण राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.

ह्याहि बातम्या वाचा –

खडकीतील खुनातील मुख्य आरोपी आठ तासात गजाआड

चेक न वटल्याप्रकरणी खासदार पुनम महाजन यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयात तक्रार

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार मावळमधून जेरबंद

‘मीदेखील लैंगिक शोषणाची शिकार’ : दंगल गर्लचा धक्‍कादायक खुलासा

‘त्या’ भाजप खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थांसह अटक