पुणे विमानतळावर ३० लाखांचे सोने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिंगापूरहून आलेल्या दोन श्रीलंकन महिलांना सोने तस्करी केल्याच्या संशयावरून सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून ९१४.२४ ग्रॅम सोन्याचे बिस्कीट व दागिने जप्त केले आहेत. या सोन्याची किंमत ३० लाख ३१ हजार ९३७ रुपये आहे.

जेट एअरवेजचे विमान गुरुवारी सकाळी सिंगापूरहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यावेळी दोन श्रीलंकन नागरिक महिला विमानतळावरील ग्रीन चॅनलमधून आपल्याकडील वस्तूंचे डिक्लेरेशन न देताच पुढे निघाल्या. त्यावेळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आल्याने त्यांच्याकडील साहित्याची पाहणी केली. तेव्हा त्यांच्याकडे २४ कॅरेट सोन्याच्या साखळ्या, बांगड्या आणि बिस्कीट असे ३० लाख ३१ हजार ९३७ रुपये किंमतीचे सोने आढळून आले. त्यांनी हे सोने तस्करी करून आणले असल्याचा संशय असल्याने ते जप्त करण्यात आले आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

हे तर मोदींच्या झुला डिप्लोमसीचे अपयश : असदुद्दीन ओवेसी

कुठे नेउन ठेवलयं पुणे ?

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ फूट ओव्हर ब्रिज कोसळला, दोघांचा मृत्यू : 23 गंभीर जखमी

शिवसेनेचा ‘या’ जागेवर निवडणुक लढवण्यास दिला नकार

Loading...
You might also like