फक्त 849 रुपयात खरेदी करा Mi चा लेटेस्ट 32 इंचाचा स्मार्ट TV, कंपनी आज देत आहे खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Mi TV 4A Horizon Edition चा ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची ऑनलाइन विक्री आज दुपारी १२ वाजता सुरू होत आहे. हा टीव्ही फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या अधिकृत वेबसाइट mi.com वरून खरेदी करता येईल. या स्मार्ट टीव्हीची किंमत १३,४९९ रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टच्या आजच्या डीलमध्ये हा स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

ऑफर
कंपनीकडून Mi TV 4A Horizon Edition च्या खरेदीवर अनेक डिसकाऊन्ट ऑफर्स दिल्या जात आहेत. या ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीला फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर ५% अमर्यादित कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. तसेच अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवर ५% सूट दिली जात आहे. तसेच तुमच्या बजेटला परवानगी न दिल्यास, तरीही तुम्ही एमआय स्मार्ट टीव्ही केवळ ८४९ रुपयाच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

फीचर्स
Mi TV 4A ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही बेजेललेस डिझाइन आणि एलईडी डिस्प्लेसह येतो. यात फुल एचडी प्लस रेझोल्यूशन मिळेल, जो शाओमीच्या अँड्रॉइड टीव्ही९ आधारित पॅचवॉल प्लॅटफॉर्मला सपोर्ट करेल. Mi TV Horizon Edition मध्ये Cortex-A53 प्रोसेसर आहे, जो १ जीबी रॅम आणि ८ जीबी अंतर्गत स्टोरेजसह येईल. Mi TV Horizon Editon स्मार्ट टीव्हीच्या दोन्ही मॉडेलमध्ये २० हून अधिक मनोरंजन अ‍ॅप्सची सदस्यता मिळेल. याशिवाय टीव्हीमध्ये उत्तम Horizon डिस्प्ले आहे. तसेच Vivid पिक्चर इंजिन आणि २०डब्ल्यू स्टीरिओ स्पीकर आणि Mi Quick Wake चा सपोर्ट आहे. हे टीव्ही Google Data Server फिचरसह येतील. म्हणजे ग्राहक कन्टेन्ट पाहताना तिप्पट जास्त कन्टेन्ट कन्ज्युम करू शकतील. तसेच नवीन स्मार्ट टीव्ही सीरिज Mi QuickWake सपोर्ट असेल, जे तुमचा टीव्ही पुन्हा ५ सेकंदात चालू करेल. याशिवाय २०डब्लू स्टीरियो स्पीकरसह DTS-HD आणि 3.5mm ऑडिओ आउटपुट, SPDIF आणि 3 HDMI पोर्ट दिले जातील.