‘त्यांच्या’ संपर्कातील 6 पोलिसांसह 32 जण क्वारंटाईन

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन   –   ग्रीन झोन म्हणून ओळख असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात काल (गुरुवारी) कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे यातील एक शासकीय कर्मचाऱ्याच कोणताही प्रवासाचा इतिहास नसताना त्याला कोरोना झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्याला नेमका कोणाकडून झाली अथवा कोरोनाची लागण नेमकी झाली कशी याबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान त्याच्या संपर्कातील 32 जणांना होम क्वाराटाईन करण्यात आले आहे. त्यात 6 पोलिसांचा देखील समावेश आहे.

जिल्ह्यातील कळंब तालुक्यात गुरुवारी तीन जणांना कोरोना लागण झाली आहे. यात पाथर्डी गावातील मुंबईहून आलेल्या पती-पत्नीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे तपासणी केली असता त्यांना लागण झाल्याचे समोर आले. तर कळंब येथील तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास देखील लागण झाली आहे. त्याला हायपरटेन्शनमुळे शहरातील उपजिल्हा रूम्णालयात अॅडमीट करण्यात आले होते. त्याचे स्वॅब घेउन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

पाथर्डी येथील पती पत्नीवर कळंब उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील त्या रूग्णाला पहाटे धाराशिव येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या 32 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या पाथर्डी येथील रुग्णाच्या दोन मुली, वृद्ध माता यांना हायरिक्स क्लोज कॉन्टॅक्टमुळे क्वारंटाईन करून आठ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट रात्री येईल असे डॉ. राजाभाऊ गलांडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान प्रशासनाने आज पाथर्डी गाव पूर्णपणे सील केले. तर कळंब शहरातील दत्तनगर व शिवाजी नगर भाग सील केला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील केले आहे.