33 Opposition Members Suspended | संसद सुरक्षेवरुन गदारोळ; आधी १४ आणि आता तब्बल ३३ विरोधी खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली : 33 Opposition Members Suspended | दोन तरूणांनी भारतीय संसदेत घुसून बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षेसंदर्भात घोषणाबाजी केली होती, तसेच सभागृहात पिवळा धुर सोडला होता. हे प्रकरण जगभरात गाजत आहे. या प्रकरणानंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला असून यावरून विरोधी सदस्य मोदी सरकारला (Modi Govt) जाब विचारत आहे. गृहमत्र्यांना निवेदन करण्याची मागणी करत आहेत. यावरून झालेल्या गदारोळात आज काँग्रेस खासदार अधीर रंजन (Congress MP Adhir Ranjan) यांच्यासह तब्बल ३३ खासदारांना निलंबित (33 Opposition Members Suspended) केले आहे. यापूर्वी याच प्रकरणावरून १४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते.

हिवाळी अधिवेशनात (Winter Session) संसद सुरक्षेचा प्रश्न गाजत असून सोमवारी सुद्धा विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरली. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ उडाला. यावेळी, लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून निलंबित केले आहे.

निलंबित केलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी, अपूर्वा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती, के नवासकानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, असिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटोनी कुमार, एस एस पलनामनिक्कम, तिरुवरुस्कर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस रामा लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू यांचा समावेश आहे. तसेच विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत के जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खालिक यांना निलंबित (33 Opposition Members Suspended) करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी लोकसभेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत
दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन करावे अशी विरोधी पक्षाची मागणी आहे.

याआधी याच कारणावरून काँग्रेसचे टी एन प्रतापन, हिबी इडेन, जोतिमनी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोसे, व्हीके श्रीकंदन,
बेनी बेहानन, मोहम्मद जावेद आणि मणिकम टागोर, द्रमुकच्या कनिमोळी, सीपीआय एमचे एस वेक्शन आणि
सीपीआयचे के. सुब्बारायन, टीएमसी सदस्य डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून अशा १४ खासदारांना
हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित केले आहे.

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मागणी केली की, गृहमंत्री अमित शाह टीव्हीवर जे निवेदन देत आहेत,
ते सभागृहात करावे. तसेच, संसदेच्या सुरक्षेसाठी सरकार कोणती पावले उचलणार, ते सांगावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Mitkari | खोटे कुणबी दाखले दिले जात असल्याचा भुजबळांचा आरोप, मिटकरी म्हणाले – ‘नागपूरमधील राजे भोसले हे…’

Pune PMC Water Supply News | गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

गाडीचा कट लागल्याने दोन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पिंपळे गुरव येथील घटना; एकाला अटक

झटपट पैसे कमावण्यासाठी वाहनचोरी करणारे गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 गुन्हे उघड

वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरीक त्रास न देण्याचे पुणे न्यायालयाचे उच्च शिक्षित मुलगा व सुनेला आदेश