35 वर्षीय ‘कोरोना’ योद्धा महिलेचा ड्यूटीदरम्यान मृत्यू

कोलकाता : वृत्तसंस्था –  चीनमधून आलेल्या कोरोनाने सर्व जग त्रस्त आहे. तसेच भारतात कोरोनाची प्रकरणे वाढतच आहेत. या कोरोना संकटात अनेक जण कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आहेत, ज्यात पोलिस, डॉक्टर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. पण त्यांनाही आता कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे.

याबाबत पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एका ३५ वर्षीय WBCS महिला अधिकारीचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नाव देवदत्ता रॉय असून ड्युटी करत असताना त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्या हुगली जिल्ह्यात एसडीओ पदावर कार्यरत होत्या.

देवदत्ता रॉय यांच्या त्यागाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सलाम केला आहे. तसेच त्यांनी देवदत्ता यांच्या पतीसह संवाद साधला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like