मुंबईत दहीहंडी उत्सवात ३६ गोविंदा जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आज राज्यभर दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहेत. जीवाची पर्वा न करता गोविंदा थरावर थर उभारत आहे . दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलंय. दहीहंडी साजरी करताना तब्बल ३६ गोविंदा जखमी झाले आहेत. सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. काहींना उपचार करून सोडण्यात आले तर काही गोविंदांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डीएसकेंवरचा धडा वगळण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आदेश

रविराज गंगाराम चांदोरकर (वय ३५) हे शिवडीतील कालेश्वर गोविंदा पथकाचा गोविंदा असून त्यांना के.ई. एम. रुग्णालयातून सोडून देण्यात आलं आहे तर वडाळ्यातील श्री गणेश गोविंदा पथकातील जान्हवी जयवंत पाताडे (वय १४) हिला पायाला मार लागला असून के. ई. एम. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत तसेच श्री गणेश गोविंदा पथकातील मनाली सुधीर मेने (वय १८), शिवडीतील न्यू लेबर कॅम्प गोविंद पथकातील शंकर बाबुराव कागलाराम (वय ५१), अमेय हिराचंद पाटील (वय २५) आणि मयूर महादेव नाईक (वय २६) हे वडाळ्यातील यश गोविंदा पथकातील गोविंदा आणि यज्ञ बाळकृष्ण मोरे (वय १७) यांच्यावर के. ई. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे काल खार दांडा सरावादरम्यान १४ वर्षीय चिराग पटेकर हा गोविंदा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खार येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार अॅड. आशिष शेलार यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन १ लाखाची मदत केली आहे.

जाहिरात

धक्कादायक…. टक्कल पडण्याच्या भीतीने मुलीची आत्महत्या

जाहिरात