लासलगाव ग्रामपंचायतीच्या 17 जागेसाठी 38 उमेदवार रिंगणात

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ जागेसाठी ८२ यांनी नामनिर्देशन फॉर्म भरले होते,त्यात ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी उतरले आहे .४४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतली असून तिन प्रभागा मधून अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीचे चित्र सोमवारी माघारीनंतर स्पष्ट झाले आहे.

सत्ताधारी ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर व नाफेड चे संचालक नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर माजी आमदार कल्याणराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य डिके जगताप व नामको चे माजी चेअरमन प्रकाश दायमा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन शहर विकास समिती पॅनल निर्माण झाले असून दोन्ही पॅनमध्ये चुरशीचा सामना या वेळी बघायला मिळणार आहे.

वार्ड नं 1
1) होळकर चंद्रशेखर गोविंदराव
2) मोरे रोहिनी चंद्रभान
3)अमिता अक्षय ब्रम्हेचा

वार्ड नं 2  
ब्रम्हेचा संतोष सुरेश होळकर सचिन शाहू , पाटिल सायली संजय

वार्ड नं 3 

1) पाटिल नानासाहेब दत्ताजी
2) होळकर वेदिका जयदत्त

वार्ड नं 4
1) शेख अफजल नासिर
2) होळकर रेवती गुणवंत
3) आहिरे पुष्पा पंडित

वार्ड नं 5
1) अब्बड़ सुनील चम्पालाल
2) पाटिल योगिता योगेश
3) चांदर सुवर्णा विकास

वार्ड नं 6
1) होळकर जयदत्त सीताराम
2) पठान यास्मीन हैदर
3) शेजवळ रामनाथ मगन.

परिवर्तन शहर विकास आघाडी चे ऊमेदवार
वॉर्ड नंबर 1
1) संतोष मुक्ताजी पवार, 2) वर्षा वेंकटेश दायमा 3) अश्विनी नामदेव बर्डे

वार्ड नंबर 2
1)अमोल सुदाम थोरे 2) रोहित बाळासाहेब पाटील 3) अनिता सुरज खैरे

वार्ड नंबर  3
1)प्रवीण शिवाजी कदम 2) सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप

वार्ड नंबर ४
1) अश्विनी प्रकाश पाटील 2) धर्मेश तुकाराम जाधव 3) रूपा कैलास केदारे

वार्ड नंबर ५
1) संतोष रामकिसन पलोड 2) माधुरी सचिन लचके 3) संगीता कल्याणराव पाटील

वार्ड नंबर ६
1) ज्योती गणेश निकम, 2) प्रकाश सर्जेराव पाटील, 3) चंद्रकांत प्रभाकर शेजवळ

अपक्ष ऊमेदवार
वार्ड नंबर ४
ताराबाई भाऊसाहेब पवार, अलका संजय वाघ

वार्ड नंबर ५
संदीप मधुकर उगले

वार्ड नंबर ६
कैलास कचरनाथ केदारे.

सतरा जागेसाठी जरी ही निवडणूक होत असली तरी लासलगाव शहरवासीयांचे लक्ष वार्ड क्रमांक तीन आणि सहा यामध्ये चांगली चुरस बघावयास मिळणार आहे. निवडणुकीत प्रथमच यंदा पारंपारिक विरोधक एकत्र आल्याने निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत बघावयास मिळणार आहे.