वाकडमधून चार सराईत गुन्हेगार हद्दपार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

वाकड पोलिसांनी हद्दीतील गुन्हेगार हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कालच एका सराईत गुन्हेगारास ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्ध केले असताना आज सराईत चार गुन्हेगारांना एक आणि दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. वाकड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17a40c84-ce2c-11e8-828a-b91fdb13a11e’]

संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (रा. काळाखडक, वाकड), बाळू महादेव वाघमारे (म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड), सचिन वसंत खलसे (बापूजी बुवानगर, थेरगाव) आणि विशाल शहाजी कसबे (काळाखडक झोपडपट्टी, वाकड) या चौघांना हद्दपार करण्यात आले आहे.

बाळू भोसले आणि विशाल कसबे हे एकाच टोळीतील सदस्य असून यांच्या टोळीतील शाहरुख खान याच्यावर यापूर्वी एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेली आहे. सचिन खलसे हा खलसे टोळीतील सदस्य आहे. बाळू वाघमारे याच्यावर तोडफोडी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चौघांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या चौघांना वाकड पोलिसांनी हद्दपार केले आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2059f837-ce2c-11e8-b0c9-6dc9dce09bbb’]

बाळू भोसले दोन वर्षासाठी, बाळू वाघमारे एक वर्षासाठी, सचिन खलसे एक वर्षासाठी आणि विशाल कसबे दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आणखी अनेक गुन्हेगार पोलिसांच्या ‘हिट लिस्ट’ वर आहेत. तडीपार गुन्हेगार हद्दीत दिसले आणि गुन्हेगारी कृत्य केल्यास एमपीडीए नुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी दिली. सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीष माने, कर्मचारी सुहास पाटोळे, नाना झेंडे यांनी केली.