श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान भिंत कोसळून 4 ठार 27 जखमी

कोलकाता : वृत्तसंस्था – देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात सुरु असताना पश्चिम बंगालमध्ये या उत्सवाला गालबोट लागले आहे. बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरु असताना मंदिराची भिंत कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आणि जखमींना नुकसान भरपाई देण्याचे घोषीत केले.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबींयांना पाच लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराची भिंत पडताच एकच गोंधळ झाला. त्यामुळे लोक सैरावैरा पळू लागल्याने मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली.

भिंत कोसळताच प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करत होता. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर २७ जण जखमी झाले. जखमी झालेल्या व्यक्तींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

देशभरात आज (शुक्रवार) होत असलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टीनिमित्त उत्तर 24 परगणा जिल्ह्यात अनेक कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परगणा जिल्ह्यातील कचुआ येथील लोकनाथ मंदिरात भाविक उत्सवासाठी जमले होते. त्यावेळी मंदिराची जीर्ण झालेली भिंत कोसळली. ही भिंत उत्सवासाठी आलेल्या भक्तांच्या अंगावर कोसळली. यामुळे एकच गोधळ उडाला. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत इतर भक्तांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like