निजामुद्दीन प्रकरण : मौलाना सादच्या अडचणीत वाढ, ED च्या चौकशीत मरकझच्या कर्मचाऱ्यांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या संक्रमणादरम्यान निजामुद्दीन मरकझ येथे तबलीगी जमातचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर चर्चेत आलेले मौलाना साद यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता ईडीने मरकझच्या चार कर्मचाऱ्यांकडे देणगीच्या नावाखाली परदेशातून आलेल्या लाखो रुपयाची चौकशी केली. या चार जणांकडे केवळ परदेशातून येणाऱ्या रुपयांची नाही तर दररोजच्या खर्चाचा हिशोब असल्याची माहिती ईडीकडे होती. चौकशी दरम्यान मरकझच्या या चार कर्मचाऱ्यांनी मोठा खुलासा केला असून त्यांनी सांगितले की, परदेशातून येणाऱ्या देणग्यांची माहिती आणि संपूर्ण देखरेख मैलाना साद यांच्या तीन मुले आणि पुतण्याकडे आहे. यामध्ये अन्य इतर कोणाचाही हस्तक्षेप यामध्ये नाही.

कुणालाच माहिती नाही
ईडीने चौघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सांगितले की, मौलाना सादचे तीन मुले आणि पुतण्या सोडून पैसे कोठून येतात आणि कोठे जातात याची माहिती इतर कोणाला नसल्याचे सांगितल. त्यांच्याकडे या प्रकरणाची संपूर्ण माहिती आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, दररोज होणाऱ्या खर्चावरही त्यांचेच संपूर्ण नियंत्रण असते. महत्त्वाचे म्हणजे ईडीने अद्याप या प्रकरणात मौलाना साद याला समन्स पाठवलेले नाही.

गुन्हे शाखेकडून हवाला कनेक्शनचा शोध
यापूर्वी गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, मरकज येथे तबलीगी जमातचा कार्यक्रम आयोजन करण्यापूर्वी सादच्या दिल्ली बँक खात्यात अचानक परदेशातून मोठ्या प्रमाणात रक्कम जामा करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मौलाना सादच्या सीएला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली होती आणि मौलाना सादला भेटून बोलण्यास सांगितले होते. परंतु सीएने सांगितले होते की मौलाना मोठी हस्ती आहे आणि ते कोणालाही भेटत नाहीत. आता गुन्हे शाखेला मरकझच्या व्यवहाराचा संशय आहे आणि गुन्हे शाखा याप्रकरणात हवाला कनेक्शन आहे का याचा शोध घेत आहेत.

बँकेनेही सूचना
यापूर्वी मौलाना साद याचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेला व्यवहार थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात बँकेने 31 मार्चला सादला माहिती दिली होती. परंतु बँकेला सूचना करून देखील बँकेतील व्यवहार सुरुच राहिले.