पश्चिम महाराष्ट्रात महापूरामुळं आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू, कोल्हापूर – साताऱ्यात अतिवृष्टीचा ‘इशारा’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर आणि सातारा भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील जीव गमावलेल्या लोकांची माहिती देत होते. म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली आणि कोल्हापूर भागात आज आणखी ३ मृतदेह सापल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या ४३ वर पोहचली आहे. अजूनही ३ जण बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात पूर परिस्थितीची महिती दिली. ते यावेळी म्हणाले की, सांगलीत काल रात्री २ तर कोल्हापुरात एक मृतदेह सापडला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील पुरात बेपत्ता झालेल्या तिघांचा अद्यापही शोध लागलेला नाही. आतापर्यंत ४,७४,२२६ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

यावेळी त्यांनी शहरात अतिवृष्टी होणार असल्याचे संकेत दिलेत. यावर बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परंतू अद्यापतरी दोन्ही जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली नाही असे ही स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त