कॉफी राईट नोंदणीच्या बहाण्याने चित्रपट लेखकाला ४५ लाखाचा गंडा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॉफी राईट नोंदणीकृत करण्याच्या बहाण्याने एका चित्रपट लेखकाला मुंबईतील एक वकिलाने ४५ लाख रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. लेखक अमरीश गोपाळ शहा यांनी फसवणूक प्रकरणी डी. एन नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी येशू राजा चढा याला मुंबई पोलिसांनी गोव्यातून अटक केली असून त्याला न्यायालयाने २१ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईच्या अंधेरी परिसरात राहणारे अमरीश शहा हे अनेक टीव्ही सिरीयल आणि बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे लेखक आहेत. आज पर्यत त्यांनी लिहलेल्या लेख मालिका आणि चित्रपटांची नोंदणी त्यांनी बौद्धिक संपदा कार्यालयात केली आहे. गत वर्षी  ऑस्ट्रेलिया येथे  सिडनी सायन्स हेल्थ प्रोग्राम आणि वेलनेस कोर्स शहा यांनी ऑनलाईन स्वरुपात पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी स्वतःचा ब्रेन हेल्थ प्रोग्राम आणि टेक्निक्स विकसित करून त्याची नोंदणी करण्यासाठी आरोपी येशू राजा चढा याला एजेंट म्हणून नेमले होते. गेल्या महिन्यात शहा यांनी त्याला नोंदणीसाठी ५२ दस्त दिले. आपली ओळख वाढवून आरोपीने शहा यांच्याकडून नोंदणी शुक्ल आणि आपल्या वयक्तिक कामासाठी ४५ लाख रुपये एवढी मोठी रक्कम घेतली. ५२ दस्त पैकी फक्त १० दस्तांची  या आरोपीने कॉफी राईट खाली नोंद केले. त्यानंतर शहा यांना या आरोपीचा संशय आला. त्यांनी आरोपीच्या मागे नोंदणीच्या कामासाठी तगादा लावला. तरी देखी तो काम करत नाही हे लक्षात आल्यावर शहा यांनी विश्वमय श्रॉफ या नवीन वकिलाचीया कामासाठी नेमणूक केली. नवीन वकील नेमल्याने आरोपकडे शहा यांनी त्यांचे ५२ दस्त माघारी देण्याची मागणी केली. तेव्हा त्याने ते दस्त माघारी देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी यशू याने २५ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश अमरीश गोपाळ शहा यांच्या नवे पाठवून दिला. परंतु हा धनादेश वठलाच नाही. म्हणून अमरीश गोपाळ शहा यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये येशू चढा याच्या विरोधात मुंबईच्या सत्र न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालनाने या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डी एन नगर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. या खटल्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणसे यांनी अजितकुमार वर्तक यांच्याकडे दिला.

न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्या नंतर आपली अटक टाळण्यासाठी येशूने न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने फटकारल्या नंतर आपले आता काहीच खरे नाही अशी भीती येशूच्या मनात दाटू लागली म्हणून त्याने मुंबई सोडून गोव्याच्या दिशेने पलायन केले. परंतु पोलिसांनी त्याला तेथे जाऊन बेडया ठोकल्या. आता येशू चढा जेलची हवा खात असून २१ डिसेंबरला या खटल्याची पुढील तारीख आहे.