तुमच्या खिशातील शंभराची नोट बनावट असू शकते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नोटा बंदीपूर्वी आपल्या देशात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला होता. बँक व इतर ठिकाणी गेल्यावर अनेकदा पैसे भरताना ५०० रुपयांच्या नोटांचे नंबर लिहून मागत होते.  ५०० रुपयांची नोट दिल्यावर घेणारा दहा वेळा ती वरुन खाली निरखून पहात असे. नोटा बंदीत ती नोट बंद झाली असली तरी तिची जागा शंभर रुपयांच्या नोटेने घेतली आहे. तुमच्या खिशातील इतर नोटांच्या तुलनेत १०० रुपयांची नोट बनावट असण्याची शक्यता अधिक आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालातील निष्कषार्तून हा अर्थ जाणकारांनी काढला आहे.

[amazon_link asins=’B07CRGDR8L,B073Q5R6VR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e85b476-acec-11e8-9955-970fb814c452′]

रिझर्व्ह बँकेच्या २०१७- १८ वित्त वर्षाच्या वार्षिक अहवालानुसार, १०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. सन २०१७- १८ मध्ये सापडलेल्या एकूण बनावट नोटांत सर्वाधिक ४५.७५ टक्के नोटा शंभराच्या होत्या. देशात २0१७-१८ मध्ये एकूण ५,२२,७८३ बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्यातील ३६.१ टक्के बनावट नोटा रिझर्व्ह बँकेने पकडल्या आहेत. नोटाबंदीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ५०० आणि २ हजाराच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. या नोटांची नक्कल करणे शक्य नाही, असा दावा नोटबंदीच्या निर्णयानंतर करण्यात आला होता. तथापि, या नोटांच्याही बनावट नोटा आढळून आल्या आहेत.  तसेच या नोटांच्या बनावट नोटा सापडण्याचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढत चालले आहे. त्यापाठोपाठ ५० रुपये व १०० रुपयांच्याही बनावट नोटा मोठ्या प्रमाणात येत असल्याचे उघड झाल्याने प्रत्येकाला आपल्याकडील नोट खरी आहे की बनावट आहे, हे सतत तपासून पाहावे लागणार आहे. तसे न केल्यास पकडले जाण्याची आणि त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाणारला विरोध करणाऱ्यांचे नातेवाईकच जमीन व्यवहारांचे दलाल : भाजप नेते प्रमोद जठार यांचा आरोप


बनावट नोटांमध्ये तब्बल ९ पटीने वाढ

२०१६ – १७ मध्ये रिझर्व्ह बँकेने कारवायांमध्ये पकडलेल्या बनावट नोटांचे प्रमाण अवघे ४.३ टक्के होते. पुढील वर्षात म्हणजे २0१७-१८ मध्ये त्यात तब्बल नऊ पट वाढ झाली आहे. नोटांबदीच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने ५0 रुपयांच्याही बनावट नोटा मोठ्या प्रमाणात येत असल्याचे नमूद केले आहे.