रक्त शोषणार्‍या डासांपासून ‘या’ 5 पध्दतीनं मिळवा सूटका, घरात पुन्हा नाही करणार ‘एन्ट्री’

पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळा सुरू झाला की डासांच्या संख्येत मोठी वाढ होते. पावसाळा डासांच्या प्रजननाचा आणि त्यापासून होणाऱ्या आजारांचा काळ असतो. चिकनगुनिया आणि मलेरिया सारखे गंभीर आजार या काळात वाढण्याचा धोका अधिक असतो. या डासांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक पावर स्प्रे आणि फोगिंग मशीन सारखे अनेक उपाय करतात. आपल्या परिसरातून आणि घरातून डासांना घालवायचं असेल तर आपल्याला देखील स्वछता राखावी लागेल.

पावसाळ्यात घराबाहेर साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होते. त्यामुळं घराच्या बाहेर पाणी साचू देऊ नका, गरज नसेल तर पाण्याची भांडी उलटी करून ठेवा. घराबाहेर कचरा साचणार नाही याची काळजी घ्या.

पावसाळ्यात घरातील डासांना घालवण्यासाठी स्प्रेचा वापर करा. घरातील डासांना घालवण्याचा हा सोपा उपाय आहे. पण या स्प्रेचा वापर त्यावरील वैधता आणि सूचना पाहूनच केला पाहिजे. ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो त्यांनी स्प्रेचा वापर करू नये. डासांचा नायनाट करणाऱ्या या स्प्रे मध्ये अनेक घातक केमिकलचा समावेश असतो. त्यामुळे हा स्प्रे चांगल्या कंपनीचा असावा.

घरातील डासांना घालवण्यासाठी चार्जिंग किंवा बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक इंसेक्ट ट्रॅपचा वापर देखील करता येईल. मोस्कीटो ट्रॅप घरातील डासांना घालवण्यास मदत करतो. एका झटक्यात अनेक डास याने मारता येतात. आवाजाचा थोडा त्रास होऊ शकतो पण डास घालवण्याची ही सोपी पद्धत आहे.

डास घालवण्यासाठी घरात कापूर, लसूण, कॉफी, लेवेंडर ऑइल किंवा पुदिना ठेवा. एका वाटीत कापूर घरातील कोपऱ्यात अर्धा तास ठेवला तर डास निघून जातील. अशा प्रकारे नैसर्गिक पद्धतीने तुम्ही डास घालवण्याच्या पद्धती वापरू शकता.

केमिकल पासून बनवलेले स्प्रे डासांसोबतच माणसांसाठी देखील हानिकारक असतात. तुम्ही या डासांना घरातून घालवण्यासाठी काही झाडांचे रोपटे देखील घरात ठेऊ शकता. या झाडांच्या वासामुळे डास येत नाहीत. तुम्ही सिट्रोनेला, लेमन बाम, मेरिगोल्ड, लेवेंडर असे झाड घरात ठेऊ शकता.