अंडे खा आणि पोटाचा घेर कमी करा

वृत्तसंस्था : सध्या अनेकजण फिट राहण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकार आमलात आणताना दिसतात. कारण शरीरीतील चरबी वाढल्यानंतर सर्वात आधी पोटावर जमा होते. याचा परिणाम असा होतो की यामुळे पोटाचा घेर वाढताना दिसतो. अनेकजण त्यांच्या या पोटाच्या घेरामुळे वैतागलेले असतात. याला कारण म्हणजे ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम करावे लागत असल्यामुळे सध्या महिला आणि पुरुष अनेकांचा पोटाचा घेर वाढताना दिसतो. परंतु तुम्हाला असा एक अन्न पदार्थ माहीत आहे का की जो खाल्ल्याने तुमच्या पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. तुम्हाला विश्वास नाही बसणार परंतु हे खरे आहे की,  अंडे पोटाचा घेर कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते.

अंडी हे प्रोटीनचे उत्तम माध्यम असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी अंडे खावे असे आहारतज्ज्ञ तसेच डॉक्टरांकडून सांगितले जाते. अंड्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. तसेच ते खाल्ल्यावर दिर्घकाळ पोट भरलेले राहते त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यात आयर्न, पोटॅशियम, व्हीटॅमिन्स याचेही प्रमाण जास्त असल्याने अंडे आरोग्यासाठी चांगले असते. अंड्याचे वेगवेगळे पदार्थ पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरतात. आपण आज माहिती घेणार पोटाचा घेर कमी करण्यासाठी अंड्याचे वेगवेगळे पदार्थ-

१. अंड़ा बुर्जी- तुम्हाला माहीत नसेल परंतु अंड्याची भुर्जी हा अतिशय पटकन होणारा आणि सोपा पदार्थ आहे. भाजीला पर्याय म्हणाल तर अंडा बुर्जी उत्तम पर्याय असून  आरोग्याला उपयुक्त असे अनेक घटक यातून मिळतात.  अतिशय कमी कष्टात होणारी ही बुर्जी तुम्ही नाष्ता किंवा जेवण अशा कोणत्याही वेळेला खाऊ शकता.

२. ऑम्लेट- अंड्यापासून बनवली जाणारी सर्वात प्रसिद्ध अशी रेसेपी म्हणजे ऑम्लेट. यामध्ये कधी कांदा, टोमॅटो, मिरची असे सगळे घालून तर कधी हाफ फ्राय अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आॅम्लेट बनवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तयार करू शकता. आॅम्लेटचा नाष्ता आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे.

३. अंडी आणि मटार किंवा इतर भाज्यांचे दाणे- तुम्हाला माहीत आहे का की, भाज्यांच्या दाण्यांमधूनही प्रोटीन्स मिळते. त्यामुळे  मटार किंवा तत्सम गोष्टींमध्ये अंडे एकत्र केल्यास तेही आरोग्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. याचा एक फायदा असा होतो की, हे एकत्र खाल्ल्याने पोट चांगल्या पद्धतीने भरलेले राहते.

४. कडधान्यासोबत अंडे-  जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कडधान्ये हा उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे. कडधान्यातून आरोग्याला अनेक पोषक घटक मिळतात. अशातच जर तुम्ही अंडे आणि कडधान्ये हा एकत्रितपणे खाल्लं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळेल. जास्तीत जास्त प्रोटीन शरीरात जाईल सोबतच पोट भरलेले राहील परिणामी चरबी कमी व्हायला मदत होईल.