लग्नात मित्राला गिफ्ट दिले पाच लिटर पेट्रोलचे कॅन

कुड्डालोर : वृत्तसंस्था

इंधन दरवाढीचे तीव्र पडसाद सध्या देशात उमटत असले तरी सत्ताधारी नेते याबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. उलटपक्षी भाजपचे कार्यकर्ते सोशल मीडियावर विविध विधानं करत या दरवाढीचे समर्थन करत जनतेलाच सुनावत आहेत. मात्र, जनतेचा रोष विविध मार्गाने समोर येताना दिसत आहे. तमिळनाडूतील एका विवाहप्रसंगी इंधन दरवाढीविरोधातील आपला संताप एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने काही तरूणांनी व्यक्त केला. नवरदेवाच्या मित्रांनी चक्क महागडे गिफ्ट म्हणून पाच लिटर पेट्रोल भरलेला कॅन दिला.

[amazon_link asins=’B073YJY6KY,B00QX3O7BQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ddc08571-ba28-11e8-b9b4-03e8d08a2525′]

नवरदेव बोहल्यावर चढल्यानंतर नवपरिणित पत्नीसह उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारत होता. त्याच वेळी त्याच्या मित्रांचे टोळके तेथे हजर झाले. त्यांनी चक्क पाच लिटर पेट्रोल भरलेला कॅन नवरदेव आणि त्याच्या नवविवाहित पत्नीच्या हातात सुपूर्त केला. या सर्वच उपस्थित हसू आवरता आले नाही. पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्यामुळे हे गिफ्ट नवरा-नवरींसाठी नक्कीच किमती ठरल्याचे यावेळी अनेकांनी मिश्किलपणे म्हटले. या लग्न समारंभातील या प्रसंगाची ३९ सेकंदांची व्हिडिओ क्लिप तयार करून ती तमिळनाडूच्या टीव्ही चॅनेलवर दाखविण्यात आली. तमिळनाडूत सध्या पेट्रोल ८५.१५ रुपये लिटरवर पोहोचले आहे.

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन