पुरावा नष्ट करण्यासाठी पाहिला होता 100 वेळा TV वरील क्राईम शो, चष्म्यावरून 5 महिन्यानंतर पटली मृतदेहाची ओळख

पोलीसनामा ऑनलाईनः – वडिल ओरडल्याच्या कारणावरून एका 17 वर्षाच्या मुलाने त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या आईसोबत मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्याने टीव्ही शो क्राईम पेट्रोल 100 हून अधिक वेळा पाहिल्याचे समोर (crime-show-was-watched-100-times-tv-destroy-evidence) आले आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने हे दुष्कृत्य 2 मे रोजी केले होते. हत्येच्या घटनेच्या 5 महिन्यानंतर (5-months-after) अल्पवयीन मुलाला ताब्यात तर आईला अटक केली आहे.

मनोज मिश्रा (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर संगीता मिश्रा (वय 39) हीला अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगा इयत्ता 12 वी चा विद्यार्थी आहे. वडील त्याला ओरडले म्हणून त्याने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लोखंडाच्या सळईने घाव घातला. त्यानंतर वडील बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. त्याच रात्री या मुलाने आपल्या आईच्या मदतीने मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

तो मृतदेह घेऊन घरापासून साधारण 5 किमी अंतरावर जंगलात गेला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याने पेट्रोल आणि टॉयलेट क्लीनरने मृतदेह जाळून टाकला. पोलिसांना 3 मेला अंशत: जळालेला मृतदेह आढळला. तीन आठवड्यांपर्यंत या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. कारण कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणत्याही व्यक्ती हरवल्याची तक्रार नव्हती.

मृत व्यक्तीच्या कुटुंबाने इस्कॉनच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन 27 मेला हरवल्याची तक्रार दाखल केली. कारण मनोज मिश्रा हे इस्कॉनमध्ये डोनेशन कलेक्टर म्हणून कार्यरत होते. येथील काही सहकाऱ्यांनी मनोज मिश्रा यांच्या मृतदेहाची चष्म्यावरून ओळख पटवली. इस्कॉनमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, मनोज दीर्घकाळापासून गैरहजर होते. मात्र ते अनेकदा भगवत गीतेचा प्रचार करण्यासाठी यात्रा करत असत त्यामुळे याबाबत कोणताच संशय आला नाही.

पोलिसांनी जेव्हा मनोजच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले तेव्हा तो बचाव करण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान जेव्हा त्याचा मोबाईलची तपासणी केली गेली तेव्हा पोलिसांना कळले त्याने क्राईम पेट्रोल ही सीरिज 100 पेक्षा अधिक वेळा पाहिली. अनेकदा चौकशी केल्यानंतर अखेर त्याने आपली चूक कबूल केली. पोलिसांनी या प्रकरणी 39 वर्षीय संगीता नावाच्या आईलाही अटक केली आहे. तिच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर 11 वर्षाच्या संगीताच्या मुलीला तिच्या आजी आजोबांकडे सुपूर्द केले आहे.