Alert : आगामी काही तासात या ५ राज्यातील ६० शहरात येणार ‘आंधी-तूफान’, जाणून घ्या संपूर्ण ‘लिस्ट’

नवी दिल्ली : पूर्ण उत्तर भारताला उष्णतेची झळ बसत आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण वायू चक्रीवादळाने मान्सूनला लांबणीवर टाकले आहे. वायू चक्रीवादळामुळे आधीच उशीर झालेल्या मान्सूनला आता अजूनच उशीर होणार आहे. मुंबईत ७ दिवस उशिरा मान्सून पोहचणार आहे. चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्याचे वातावरण बदलले आहे. काही भागात पाऊस देखील झाला आहे. हवामान विभागाने माहिती दिली की हा मान्सूनपूर्व पाऊस आहे.

भारतीय हवामान विभागाने माहिती दिली की, देशाच्या ५ राज्यातील ६० शहरांमध्ये आज आणि उद्या आंधी-तूफान येऊ शकतेय किंवा खूप पाऊस पडू शकतो. चला माहिती करून घेऊ या. या ६० शहरांत तुमचे शहर तर नाही ना ?

उत्तरप्रदेश
मिर्जापुर, अमेठी, बदायूं, बांदा, बहराइच, बाराबांकी, चित्रकूट, एटा, इटावा, फैजाबाद, फर्रुखाबाद, फिरोजाबाद, गोंडा, हरदोई, कन्नौज, कानपुर, रायपुर, लक्सर, मैनपुरी, मथुरा, पीलीभीत, प्रयागराज, रायबरेलीमध्ये आज आणि उद्या गडगडाटासह गारांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेश
बालाघाट, छतरपुर, छिंदवाड़ा, दमोह, डिंडोरी, गुना, होशंगाबाद, जबलपुर, कटनी, मंडला, पन्ना, रायसेन, रीवा, सागर, सिवनी, शहडोल, शिवपुरी, सीधी, उमरिया, विदिशा मध्ये आंधी-तूफान येऊ शकते.

छत्तीसगढ़
बलरामपुर, बिलासपुर, जशपुर, रायगढ़, सूरजपुर मध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक
कर्नाटकमधील बेळगाव, म्हैसूर, मांड्या आणि बेंगलुरू मध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे

गुजरात
अमरेली, गिर सोमनाथ, दीव, जूनागढ़, पोरबंदर, राजकोट, जामनगर आणि द्वारकामध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे.

You might also like