बाबो ! देशातील या शहराने गाठली तापमानाची पन्नाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या उष्णतेचा कहर सुरु आहे. तर महाराष्ट्रातही तापमानाने ४५ डीग्री सेल्सीअसचा टप्पा ओलांडला आहे. देशात सध्या उष्णतेची लहर सुरु आहे. परंतु देशातील एका शहराने चक्क जगभरातील तापमानाचे विक्रम मोडीत काढले आहेत. सलग २ दिवस राजस्थानातील चुरु येथे तापमानाने पन्नाशी गाठली आहे.

राजस्थानातील चुरु येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. चुरु येथे आज तब्बल ५०. ३ डीग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर भारतात सध्या भीषण उष्णतेची लाट पसरली आहे. त्यात सुर्य अक्षरशं: आग ओकत आहे. राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरयाणा, चंदीगढ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, झारखंड, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये उष्णतेची लाच कायम आहे. राज्यात चंद्रपुरमध्ये सर्वाधिक ४८ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाली होती.